
पाली-पाथरट येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली-पाथरट येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९५० रुपयांची नऊ लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप पांडुरंग भोसले (५०, रा. पाली बाजारपेठ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाली-पाथरट येथील चिरेखाण जवळील झाडाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. त्यांच्याकडे ९५० रुपयांची नऊ लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.