
दापोली तालुक्यात सलग दोन दिवस पर्यटकांच्या गाडीला अपघात
दापोली :- दापोली तालुक्यात सलग दोन दिवस पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला आहे. दापोली तालुक्यातील डौली या गावी शनिवार दिनांक २७ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चालकाचा ताबा सुटून टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून घसरून नदीत कोसळली.
सुदैवाने नदीला पाणी कमी होते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. कोणत्याही प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. दापोलीला आलेल्या पर्यटकांच्या गाडीला डौली येथे झालेल्या अपघातग्रस्त टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये मधून एकूण अकरा प्रवासी प्रवास करत होते.
तसेच सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक २८ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास दापोलीकडून हर्णै कडे जाणाऱ्या युवकांच्या कारला आसूद बाग येथे अपघात झाला आहे .
दापोलीकडून हर्णै कडे काही युवक रविवार सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी निघाले होते. त्यांची कार आसूदबाग परिसरात रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. सुदैवाने याही अपघातात कोणत्याही युवकांना इजा झाली नाही. सर्व युवक दापोली बाजारपेठ मच्छी मार्केट येथील असल्याची माहिती प्राप्त होत आहे .