
विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील फणसू-भंडारवाडा येथे नितीन प्रभाकर सुर्वे (५४) याच्यावर अवैध दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन सुर्वे हा फणसू भंडारवाडा येथे संशयितरित्या वावरताना आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ बिगरपरवाना देशी दारू संत्रा जीएमच्या १८० मि.ली. च्या १५ प्लास्टिक बाटल्या आढळल्या. या प्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.