
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण राजरत्न जाधव (वय २७) व शोहेब आदम शेख (वय ३५) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) रात्री सात ते आठ या कालावधीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार रुपेश भिसे व पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खपरे यांनी ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.