
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील वळके-पाली येथील महिलेने राहत्या घऱी इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ उपचारासाठी तिला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्याचा सांगितले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. श्रावणी श्रीकांत गोरे (वय ३२, रा. वळके पो. पाली, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १७ जुलैला कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रावणीने राहत्या घरात अज्ञात कारणातून इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. उपचारासाठी पाली नंतर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.