
मिरजोळे येथे दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः शहरातील मिरजोळे-पाटीलवाडी येथे पोलिसांनी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश गणपत जाधव (५२, रा. मिरजोळे, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित संदेश हा मिरजोळे पाटीलवाडी धार येथील कच्च्या रस्त्याच्या बाजूला जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.