
दापोली येथे बस चरात फसली, सुदैवाने प्रवासी बचावले
दापोली : बसस्थानकातून सकाळी सुटलेली फरार-मोगरेवाडी एसटी बस असोंड येथे रस्त्यालगतच्या चरात फसली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्यावरून बाहेर काढलेली बस मातीत रुतली. तसेच एका बाजूला कलांडल्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर चालक आणि वाहकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. यामुळे अनेक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.