
खेडमध्ये कंटेनर – कारचा अपघात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक रविवारी सकाळच्या सुमारास कंटेनर व कार यांच्यात झालेल्या अपघाताने वाहतूक काहीकाळ खोळंबली. अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
मुंबईहून खेडच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला पाठीमागून येणारी कार टँकरच्या टायरवर जावून आदळली. खड्ड्यांमुळे मार्गाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होताच अडकलेल्या वाहनाचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.