
हॉटेल आमंत्रणचे मालक नंदकुमार कदम यांचा देहदानाचा निर्णय
रत्नागिरी,- हॉटेल आमंत्रणचे मालक नंदकुमार ना. कदम यांनी आपल्या देहदाना संबंधीची सर्व कागदपत्रे शासकीय मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
त्यांनी हे काम सामाजिक जाणीवेतून केले आहे. शासकीय मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रेरणादायी मदत केली आहे. तसेच पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे, व व्यावसायिक उल्हास गुणीजन यांचे नंदकुमार कदम यांनी आभार आहे. या देहदान प्रक्रियेत मला माझा मुलगा सिध्देश व मुलगी प्रियांका यांनी कोणताही आढा-वेडा न घेता. देहदानाच्या फॉर्म वर सहया दिल्या व सुनबाई सौ. नम्रता कदम यांनी नैतीक पाठबळ सर्वांना दिले, असे श्री कदम यांनी सांगितले.