
मुसळधार पावसाने खेड शहराला पुराचा वेढा
खेड: तालुक्यामध्ये रविवारी पहाटेपासून आभाळ फाटल्यागत पावसाने मुसळधार हजेरी लावली.
रविवारी दुपार पर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. पावसाच्या थैमानामुळे शहरासह ग्रामीण भागाचा संपर्क तूटून जनजीवन विस्कळीत झाले. चोरद, नारिंगी, जगबुडी या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पूर परीस्थिती निर्माण झाली. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी खेड बाजार पेठेत सुरुवात झाल्याने खेड मध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे
गेल्या दोन दिवसा पासून पाउस मुसळधार कोसळत आहे त्या मूळे खेड मधे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती . सकाळी १० वाजे पर्यंत चोरद, नारिंगी व जगबुडी नदयांनी धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरुवात केली
त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होवून नद्यांना पूर आला. या मुळे जन जीवन झाले. पहाटे पासून सलग कोसळलेल्या पावसाने सखल भागात पाणी शिरल्याने रस्ते जलमय होत ग्रामीण भाग देखील पुराने प्रावित होत संपर्कहीन झाला.