
मुसळधार पावसाने चिपळूण शहरात पूरस्थिती
चिपळूण: जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला चांगले झोडपून काढले आहे. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. चिपळूण शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले. तसेच शहरातील काही भागात रस्त्यांवर पाणी आल्याने वाहन चालकांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
रविवारी पडलेल्या पावसाने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. या सर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीयगीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अन्य अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूणमध्ये चांगलाच पाऊस पडत आहे. तर शनिवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने रविवारी दिवसभर चिपळूणला चांगलेच झोडपले. या पावसाने वाशिष्ठी, शिवनदीसह ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीच्या पाण्याची पातळी ५.२४ मीटरपर्यंत गेली. कोळकेवाडी धरणाच्