
खेडमध्ये फळे वाहतुक करणारा टेम्पो उलटला
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ रेल्वेस्थानक फाट्यानजीक फळे वाहतुक करणारा टेम्पो उलटल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. चालक के.ए.53/ए.बी.5820 क्रमांकाचा टेम्पो घेवून बंगलोर येथून मुंबईच्या दिशेने जात होता. रेल्वेफाट्यानजीक आला असता त्याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडला. टेम्पोच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.