
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावर कवठेवाडी-वाटद येथील सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत हेलकावे खाणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दत्ताराम कृष्णा धनावडे (रा. वाटद, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दारूच्या नशेत रस्त्यावरून जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.