
बिजघर येथून दोन सोनसाखळ्या लंपास
खेड:- तालुक्यातील बिजघर येथून घरातील हॉलमध्ये ठेवलेल्या पर्समधून चोरट्याने दोन सोनसाखळ्या लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर बुधवारी सायंकाळी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत रोहिणी रूपेश दोडेकर (३१ रा. बिजघर-टाकेवाडी, सध्या रा. भिवंडी-ठाणे) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्या ३ जुलै रोजी हुंडाई कंपनीच्या ओरा कारने कुलदैवतेच्या दर्शनासाठी पती, मुलगा व चालकासह गावी आले होते. पूजेची तयारी करत असताना चोरट्याने पर्समधून दोन सोनसाखळ्या लंपास केल्या. पर्समधून सोनसाखळ्या चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदवली.