
परशुराम घाटातील अपघातात एक जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सवतसडा धबधब्यासमोरील वळणावर ट्रेरलची दुचाकीस्वाराला धडक बसून अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
या प्रकरणी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. समाधान सिद्धार्थ सावंत (वय २१, बौद्धवाडी, सावर्डे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तसेच ट्रेलरचालक त्रिभुवननाथ भोंदलप्रसाद यादव (रा. उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद हेडकॉन्स्टेबल पांडुरंग पाटील यांनी दिली आहे.