स्पेनच्या संस्थेचे पदाधिकारी जेव्हा सौ.निकीता कांबळे यांची आवर्जून चौकशी करतात…….
रत्नागिरी : मागील सुमारे 16 वर्षे आपल्या संस्थेच्या कोऑर्डिनेटर सौ निकीता कांबळे ह्या भाकर संस्थेमध्ये जेव्हा कार्यरत होत्या त्यावेळी 16 वर्षात अनेक प्रोजेक्ट मध्ये त्यांनी काम केले, देशांतर्गत आणि परदेशातील अनेक संस्था या प्रोजेक्ट मध्ये भाकर संस्थेच्या माध्यमातून काम करीत होते*……
*साधारणपणे सन 2020 पासून सौ.निकीता कांबळे मॅडम ह्या आपल्या संस्थेमध्ये कोऑर्डिनेटर पदी रूजू झाल्या, आपल्या संस्थेच्या कामात त्यांनी अपार मेहनत करुन गेली चार वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो गरीब रुग्णांना सहकार्य केलं आहे आणि करीत आहेत*
*आज स्पेन मधील संस्थेचे पदाधिकारी रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण प्रोजेक्ट साठी आले.त्यावेळी त्यांनी भाकर संस्थेमध्ये सौ.निकीता कांबळे मॅडम यांची चौकशी केली आणि संपर्क साधला.कोरोना काळानंतर सुमारे 4 वर्षांनी हे पदाधिकारी रत्नागिरी मध्ये आले आहेत, या शिष्टमंडळात रागिणी,जॉर्दी,मेरिया,आयदा,माहिते यांचा समावेश आहे आता कांबळे मॅडम भाकर संस्थेमध्ये नसूनही त्यांच्या कामाची पध्दत त्यांना माहीत असल्याने त्यांनी कांबळे मॅडम यांना भेटावयास बोलावले, त्यावेळी कांबळे मॅडम यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या कार्याची माहिती दिली, आपल्या संस्थेच्या कामाची पद्धत ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि स्पेन वरून आलेल्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेला भेट देण्याचा विचार असल्याचे सांगून सौ.निकीता कांबळे यांच्या कामाचा गौरव केला*