रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार मा.नारायणराव राणे यांची घेतली सदिच्छा भेट,केली महत्वपूर्ण मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी रत्नागिरीत उपस्थित असणारे मा.नारायणराव राणे यांची रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज सदिच्छा भेट घेत शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच रत्नागिरी -सिंधुदुर्ग या दोनही जिल्ह्यांसाठी संयुक्त असणाऱ्या राजापूर येथील पासपोर्ट सेवा केंद्राऐवजी नागरिकांच्या अधिक सोयीचे व्हावे त्यांचा वेळ व प्रवास खर्च वाचावा यादृष्टीने दोनही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी या भेटीत आज मनसेकडून करण्यात आली यावेळी शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी,मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनिल साळवी, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर, शेतकरी सेना शहरअध्यक्ष भारती कुंभार आदि उपस्थित होते.