गुंबद ग्रामपंचायत मध्ये “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या फॉर्म भरण्याचा शुभारंभ.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, रत्नसिंधु योजनेचे सदस्य किरणशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज रत्नागिरी तालुक्यातील गुंबद ग्रामपंचायत मध्ये सरपंच उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे,बानू खलफे ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना उपविभागप्रमुख अजिम चिकटे, शिवसेना पक्ष कार्यकर्ते – नदीम खान, सुफीयान पिलपिले, ग्रामसेवक संदीप जाधव यांच्या उपस्थित आज”मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या फाँर्म भरण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गुंबद (सैतवडे) गावातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
