
रत्नागिरी शहरातून दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- शहरातील नवकार प्लाझा येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली, शहर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता. ६) दुपारी नवकार प्लाझा-मारुती मंदिर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर जैनुद्दीन शेख (वय ४५, रा. शारदा मंदिर, मारुती मंदिर रत्नागिरी) यांनी दुचाकी शनिवारी मारुती मंदिर नवकार प्लाझा येथे समीर जेनरिक मेडिकल येथे पार्क केली होती. चोरट्याने ती पळविली.