
लांजा तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले
लांजा : लांजा तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले असून लांजा दाभोळे रस्त्यावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे नीवसर येथे गोठ्यावर झाड कोसळून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काजळी नावेरी मुचकुंदी नद्यांना पूर आला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.
बेर्डे वाडी आणि खोरनिनको धरण क्षेत्रात कोणताही धोका नाही. आज सकाळी मौजे निवसर येथे श्रीम.लक्ष्मी भिकाजी शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर झाड पडून नुकसान झाले आहे. नुकसान रक्कम 37810/- झाले आहे. पावसाची संततधार असल्याने लांजा शहरासह तालुक्यातील नदी नाले दुधडी भरून वाहत होते लांजा शहरात लांजा शहरात वैभव वसाहत येथील रस्त्यावर पाणी आले होते. लांजा आसगे दाभोळे राज्यमार्गावर राज्यमार्गावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने दतर्फा वाहतूक ठप्प होती. सायंकाळी 4 वाजताच्या दरम्याने या पुलावरून पाणी जात होते दुचाकी आणि चार चाकी वाहने अडकलेली होती.
लांजा तहसील येथील नियंत्रण कक्षावरून मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसाने मोठ्या नुकसानीच्या घटना नाहीत. लांजा मंडळ-37 मिमी , साटवली मंडळ-52 मिमी , पुनस मंडळ- 54 मिमी , भांबेड मंडळ-47 मिमी, विलवडे मंडळ – 54 मिमी, आजचा एकूण पाऊस -244 मिमी , आजचा सरासरी पाऊस 48.8 मिमी आज अखेर एकूण सरासरी पाऊस 1087.2+48.8=1136 पावसाची नोंद झाली आहे.