
झाड अंगावर पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी: शहरानजीकच्या सोमेश्वर येथे पिंपळाचे झाड कोसळून तिघे जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मीकांत वेदरे असे अंगावर झाड पडलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) ला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमेश्वर मराठी शाळेजवळ पिंपळाचे भलेमोठे झाड आहे. हे झाड अंगावर पडल्याने दुचाकी चालक प्रतिक मयेकर आणि पायी जाणारे लक्ष्मीकांत वेदरे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर गुरुनाथ भाटकर किरकोळ जखमी झाला होता. प्रतिक मयेकर यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर लक्ष्मीकांत वेदरे यांनी गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान वेदरे याचा मृत्यू झाला.