
जिल्ह्यात सोमवारी शाळा महाविद्यालयांना सुट्टी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, बऱ्याच ठिकाणी पुलावरुन पाणी वहात आहे. काही ठिकाणी गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये तसेच पूर्व दक्षता म्हणून उद्या सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासानाकडून घेण्यात आला आहे.