
दुचाकीला धडक देणाऱ्या बोलेरो चालकावर गुन्हा
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ हरेकरवाडी येथे दुचाकीला धडक देणाऱ्या बोलेरो चालकावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणी ते आरवलीच्या दिशेने सुसाट वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनचालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जाणाऱ्या दुचाकीला फरफटत नेले होते. यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर उडून गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला होता. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चारचाकी चालक परेश हेमंत देवरुखकर याच्यावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.