
अज्ञात कारणातून तरुणाचे विषारी औषध प्राशन
रत्नागिरी:- पडवे (ता. गुहागर) येथील तरुणाने अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आसीम आदम जांभारकर (वय २५, पडवे, ता. गुहागर) असे विषारी औषध प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. मिळालेल्या माहितीनुसार जयगड जेटी येथे असताना आसीम जांभारकर याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले. तत्काळ उपचारासाठी त्याला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.