
चिपळुणात दुचाकींमध्ये टक्कर, दोन जखमी
चिपळूण : शहरातील गोवळकोट पुलावर २ जुलै रोजी सायंकाळी ५.१५ वाजता दोन दुचाकींत अपघात होऊन आमन फईम मुल्लाजी (१७ वर्षे ७ महिने, खंड) व जैद अब्दुलमजीब शाहफकीर हे दोघे जखमी झाले.
याप्रकरणी आयान आसीफ नाईक यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमन हा त्याचा मित्र जैद याला आपल्या ॲक्सीस दुचाकीवरून घेऊन गोवळकोट पुलाजवळ आला असताना समोरुन येणाऱ्या आयान याने त्याच्या ताब्यातील ॲक्सीस दुचाकीने जोराची धडक दिली. यात आमन याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून जैद हाही किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर आयान हा पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.