
दहिवली येथे रेल्वेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू
चिपळूण:- कोकण रेल्वे मार्गावर दहिवली येथे तरुणीला रेल्वेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना १ जुलैला दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ३) नोंद करण्यात आली. प्रतीक्षा दीपक चव्हाण (२०, रा. देऊड जाकादेवी, सध्या रा. दहिवली चिपळूण) असे मृत तरुणीचे नाव आहे.
प्रतीक्षा रेल्वे रूळाच्या शेजारी उभी असताना रत्नागिरी ते मुंबई जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसची धडक बसली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ मांडवी एक्स्प्रेसने चिपळूण रेल्वे स्थानकात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.