
खेड शिव खुर्द मध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड:- तालुक्यातील शिवखुर्द कुळेवाडी येथील एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
अविनाश अकुंश पाचांगले (वय ३० वर्षे, रा शिवखुर्द कुळेवाडी, ता. खेड) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यातील मयत हा दारुचा व्यसनी होता. काही दिवसापुर्वी तो मोटारसायकलवरुन पडल्याने त्याचे पायाला दुखापत झाली होती. दारुचे व्यसन व दुखापतीला कंटाळुन झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.