
राजापूर मूर येथे विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू
पाचल ( वार्ताहर )
राजापूर तालुक्यातील मूर येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक दामोदर सुतार ( मूर- सुतारवाडी वय वर्ष 42) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, दीपक दामोदर सुतार हे राजापूर येथील एका रेस्टॉरंट मध्ये वेटरचे काम करतात. आज बुधवार 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल परिसरात काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे शोकांकिका पसरली असून घडलेल्या घटनेबाबत परिसरात दुःख व्यक्त करण्यात येतं आहे.
घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी ग्रामस्थांच्या मदतीने रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच पोलीस दूरक्षेत्र रायपाटणचे पोलीस हेडकॉस्टेबल कमलाकर तळेकर, भीम कोळी, स्वप्नील घाडगे रायपाटण रुग्णालय येथे दाखल झाले. हाती आलेल्या माहितीनुसार अधिक तपास चालू आहे…