
कोकण पदवीधरच्या यशाबद्दल रत्नागिरी भाजपचा जल्लोष
रत्नागिरी: भाजपचे निरंजन डावखरे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून असल्याने भाजप जिल्हा कार्यालयामध्ये मंगळवारी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोष केला. सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, डावखरे साहेब आगे बढो हम आपके साथ है, अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. तब्बल 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी काल जाहीर केले.
हाच विजय उत्सव साजरा करण्यासाठी भाजप जिल्हा कार्यालयामध्ये मंगळवारी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोष केला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत पदवीधर जिल्हा संयोजक मनोज पाटणकर यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, डावखरे साहेब आगे बढो हम आपके साथ है, अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
भाजपाला लोकसभेनंतर याही निवडणुकीमध्ये मिळालेले यश पाहता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते..