
महिलेला विनयभंगासह ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला 3 वर्षाची शिक्षा
संगमेश्वर : महिलेचा विनयभंग करून धक्काबुक्की करणाऱ्या आणि कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला न्यायालयाने 3 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
धामणी सोनारवाडी येथील सतीश विठोबा चव्हाण (30 ) असे आरोपीचे नाव आहे. या युवकाने सन 2021 मध्ये आंबेड येथील महिलेचा विनयभंग करत धक्काबुक्की केली होती तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार तसेच पोलीस हवालदार संतोष झापडेकर, पोलीस हवालदार एस एस कामेरकर यांनी महत्वाचा तपास केला. सन 2021 मध्ये आरोपी सतीश विठोबा चव्हाण याला संगमेश्वर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी सतीश चव्हाण याला गुन्हे प्रकरणे साडेतीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.