
अपघात प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल
मंडणगड: मंडणगड शहरात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात करण्यास कारणीभूत असलेल्या गाडीचे चालका विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० रोजी गाडीमालक अरबाज हनिफ वाडकर (२७, रा. किंजळघर) व इरफान सिराज मोमीन (२८, रा. धुत्रोली) गाडीचालक आपल्या ताब्यातील इको गाडीने (एम.एच. ४३-ए.एन. ७६६७) किंजळघरकडे जाते होते.
गाडीचे चालकाने गाडी बेदरकारपणे चालविल्याने गाडी रस्ता सोडून मंडणगड शहरातील परिवार पार्क समोरीन नाल्यामध्ये जाऊन अपघात होऊन गाडी प्रवास करणारे दोघेही जखमी झाले व गाडीचे नुकसान झाले. मंडणगड पोलीस स्थानकात गाडीचे चालका विरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी. एस. बाणे अधिक तपास करीत आहेत.