
रत्नागिरी शिरगाव येथे चालत्या रिक्षावर फांदी पडून चालक जखमी
रत्नागिरी : रत्नागिरीतील शिरगाव येथे चालत्या रीक्षावर झाडाची फांदी पडून चालक जखमी झाल्याची घटना सोमवार १ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शाहअजीम महम्मद हुसैन पटेल असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, शाहअजीम महम्मद हुसैन पटेल हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन साखरतर ते रत्नागिरी प्रवास करत होते. यावेळी रिक्षेवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे रिक्षा चालक जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पटेल हे शाळेतल्या मुलांना रत्नागिरीतून साखरतर येथे पोहोचवण्यासाठी साखरतर वरून रत्नागिरीकडे येत असताना शिरगाव येथे रिक्षावर झाडाची फांदी पडली. अपघातानंतर रिक्षा चालक पटेल यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.