
वाहतुकीस अडथळा, ट्रक चालकावर गुन्हा
खेड: भरणे नाका येथील महामार्गाच्या उड्डाणपूल खाली वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे मार्गावर ट्रक उभा केल्या प्रकरणी ट्रक चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ रोजी सकाळी १०.३० वा च्या सुमारास घडला.
कृतज्ञ दिपक कडवले, वय-२६ वर्षे रा- हेलवाक कोयनानगर, ता. कराड जि. सातारा. असे त्या गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. चालक कडवले याने स्वतःचे ताब्यातील ट्रक नंबर एम एच १२ ड ई. एफ. १७९३ हा ट्रक सार्वजनिक रोडवर रस्त्याचे मधोमध रहदारीचे ठिकाणी येणारा जाणाऱ्या वाहनांना अडथळा होईल. अशा स्थितीत मिळुन आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.