
ट्रकच्या धडकेत कामगार गंभीर जखमी
खेड
तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील श्री पुष्कर केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स प्रा. लि. या कंपनीमध्ये मागे येणाऱ्या ट्रकची एका कामगाराला धडक बसून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना २१ जून रोजी सांयकाळी ५ वा च्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कुमार रंगा कदम वय – २० वर्षे मेमत फला समीतेर ता . खेरवारा जि . उदयपूर राजस्थान असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर गजानन बाबाजी कदम, वय ६२ रा. भेलसई चौथाई ता. खेड असे जखमी कामगाराचे नाव आहे. यातील गंभीर जखमी हे २१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजताचे सुमारास श्री पुष्कर केमिकल ॲन्ड फर्टिलायझर्स प्रा. लि . युनिट ०१ प्लॅट नं . १०२ १०३ येथे गेटच्या आतमध्ये ट्रक नं. जे. जी. २७ टी डी ६२६४ वजन करुन आल्यावर ट्रकमध्ये असलेले गजानन बाबाजी कदम हे क्लिनर साईडने गाडीच्या खाली उतरुन पाठीमागे चालत जात असताना ट्रक चालक याने कदम यांना न पाहता ट्रक पाठीमागे घेतल्याने त्यांच्या उजव्या पायाचे पंजावरुन ट्रकचे पुढील चाक गेल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी ट्रक चालक राहूल कुमार रंगा मिना यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.