
बोरज येथील जिओ टॉवरच्या बॅट-या लंपास
खेड: तालुक्यातील बोरज येथील रिलायन्स जिओ कंपनीचे मोबाईल टॉवरच्या १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार चार्जिंगच्या बॅट-या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २५ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली
या प्रकरणी निलेश बबन धोत्रे वय ३७ वर्षे रा. नातुनगर बौध्दवाडी ता. खेड यांनी तक्रार दाखल केली आहे १,४०,००० रुपये किंमतीचा एकुण ०४ चार्जिंगच्या बॅट-या प्रत्येकी ४८ वोल्टच्या व्हीजन कंपणीच्या १०० ए. एच च्या सफेद रंगाच्या प्रत्येक बँटरीची किमत सुमारे ३५,००० रुपये किमत. असुन या बॅट-या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या