
चिपळुणात मटका चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
चिपळूण : चिपळुणात मटका चालवणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना बुधवारी घडली. त्याच्याकडून ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुभाष सखाराम मिरगल (६२, खेर्डी बाजारपेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मिरगल हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्याच्या पलिकडे बंद असलेल्या टपरीच्या आडोशाला गैरकायदा विनापरवाना मुंबई मटका जुगाराचे साहित्य जवळ बाळगून लीकांकडून पैसे स्वीकारुन जुगार खेळ चालवताना पोलिसांना आढळला.