
लोटेत ट्रक अपघातात वृद्ध गंभीर, एकावर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील श्री पुष्कर केमिकल ॲण्ड फर्टिलायझर्स कंपनीसमोरील गेटमध्ये ट्रकच्या धडकेने वृद्ध गंभीर जखमी झाला. गजानन बाबाजी कदम (६२, रा. भेलसई) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
ट्रकचालक राहुलकुमार रंगा (२०, रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. कदम हे कंपनीच्या गेटच्या आतील ट्रकचे वजन करून आल्यावर क्लिनर बाजूने खाली उतरून • पाठीमागे चालत असताना टकचालकाने मागे न पाहता ट्रक पाठीमागे घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. टकचालकाने विनापरवाना ट्रक चालवल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.