
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखीचा मृत्यू
रत्नागिरी ः जिल्हा शासकिय रुग्णालयच्या अतिदक्षता विभागाच्या पोर्च मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी पुरुषाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ४५ आहे ( नाव, गाव पत्ता समजून येत नाही) ही घटना मंगळवारी (ता. २५) सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या पोर्च परिसरात एक अनोळखी बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याचे रुग्णालयाच्या सुरक्षा पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आला. तत्काळ त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.