
दुचाकी अपघात, चालकावर गुन्हा दाखल
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर फाटा येथे उभे असलेल्या व्यक्तीस दुचाकीने जोरदार धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी दुचाकीस्वार शरद भिकाजी इतापे याच्यावर गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद इतापे है मोटारसायकल घेऊन अडूर ते वेळणेश्वर असे येत असताना वेळणेश्वर फाट्यावर उभे असलेले गणेश कदम यांना धडक देऊन दुखापत केली. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.