
बांगलादेशी नागरिकाला न्यायालयीन कोठडी
चिपळूण : बेकायदा वास्तव्य करत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील रामपूर येथून ताब्यात घेत अटक केली होती. त्याची एका दिवसाची पोलीस कोठडी संपातच त्याला रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महम्मद युनूस यामीन मुल्ला (सध्या- उमरोली, मूळ-नाराईल-गालीया नाथा, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. महम्मद मुल्ला हा वैध प्रवासी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन रहात असल्याच्या माहितीनुसार रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने त्याला रामपूर येथे सुरु असलेल्या बांधकामठिकाणी याला ताब्यात घेत अटक केली होती.