ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीच्या चंदिगढ येथून मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : चंडीगढ़ येथून बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन व शेअर मार्केट ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला खेड पोलिसांनी अटक केले आहे. नीरज महेंद्र जांगरा (२२, सध्या रा. घर नंबर १७८, सेक्टर ३८(A), चंडीगढ़, मूळ रा. कुर्दल -७०, भिवाणी-हरियाणा) असे त्याचे नाव असून, यासंदर्भात खेड पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला २५ जून जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीला १९ एप्रिल ते २४ मे २०२४ या कालावधीत “ARK Learning Group” या व्हॉट्स ॲप ग्रुपवरून ट्रेडिंग संदर्भातील मेसेज तसेच ८२५०७३३५०३ आणि ८७३५९३८२३९ या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉट्स ॲप संदेश येत होते. फिर्यादीला या कंपनीमध्ये पैश्याची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे सांगून अनोळखी इसमांनी २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादिने ३ जूनला खेड पोलीस ठाणे गाठून पोलिसांना झाल्या फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार भा.द.वि.सं चे कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६(क),(ड) अन्वये ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी अपहरित रक्कम २४ लाख ८५ हजार ही रक्कम आरोपीच्या ६ वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पाठविली होती. या ६ बँक अकाऊंटबाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली व फिर्यादी यांची अपहरित रक्कम ही पुढे अन्य ४३ बँक अकाऊंटमध्ये वळवण्यात आल्याबाबत व पुढे २२ वेगवेगळ्या अकाउंटमध्ये वळवण्यात आल्याची माहिती समोर आली. या अपहरित रक्कमेपैकी ४ लाख ५० हजार रुपये हे चंडीगढ़ व जोधपूर येथील एटीएमचा वापर करून काढण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चंडीगढ़ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक पाठविण्यात आले.
या तपास पथकाने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या तपासामध्ये एटीएममधून पैसे काढणाऱ्या इसमाबाबत माहिती घेतली असता एक इसम आपल्या व्यसनाच्या लोभापोटी अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून एटीएममधून पैसे काढून त्याच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले; तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या इसमाचा शोध घेण्यात आला व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा हा चंडीगढ़ येथे सापडला. त्याला २ जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २५ जून जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा गुन्हा करताना त्याने अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने अनेक बँक खाते उघडून त्यावर अनेकांकडून रक्कम प्राप्त करुन घेऊन अनेक बँक खात्यांचा व मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार दीपक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, पोलीस शिपाई रूपेश जोगी, सुमित नवघरे, शिरीष साळुंखे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार रमिज शेख पोलीस शिपाई आणि सायबर पोलीस ठाण्याचे सौरभ कदम यांनी केली.
शेअर ट्रेडिंग ॲप्सचा वापर करून शेअर मार्केट अथवा ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग ॲप्सच्या सत्यतेबाबत पडताळणी करावी. कमी कालावधीतील जास्त परतव्याच्या आमिषाला बळी पडू नका; तसेच टेलिग्राम किंवा व्हॉट्स ॲपद्वारे आलेल्या लिंकवरून ट्रेडिंग ॲप डाउनलोड करू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, यांनी केले आहे.