
प्रादेशिक मनोरुग्णालयाती अनोळखी महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या अनोळखी महिलेला पुणे येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना १० जून ला सायंकाळी साडेसात वाजता ससुन हॉस्पिटल पुणे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अनोळखी महिलेला लिव्हरचा त्रास होऊ लागल्याने पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.