
रत्नागिरी सीए ब्रँचतर्फे प्रोफेशनल इथिक्स,प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी कार्यशाळेला प्रतिसाद
रत्नागिरी : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी आणि रत्नागिरी सीए ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोफेशनल इथिक्स आणि प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी यावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित या मार्गदर्शन सत्राला ५१ सीए उपस्थित होते.
पहिल्या सत्रात सीए इन्स्टिटयूटच्या सेंट्रल कौन्सिलचे मेंबर आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी “कोड ऑफ इथिक्स आणि सीएंनी सर्टिफिकेशन करताना घ्यायची काळजी” यावर मार्गदर्शन केले. इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या डिसीप्लिनरी कमिटीच्या विविध निर्णयांचा या वेळी सीए किनरे यांनी सविस्तर आढावा घेतला. सीएसाठी येणाऱ्या काळातील नवीन व्यावसायिक संधी याबाबतीत त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए मंगेश घाणेकर यांनी “रेरा सर्टिफिकेशन” यावर मार्गदर्शन करताना रेरा कायद्यांतर्गत द्याव्या लागणाऱ्या विविध सर्टिफिकेशन फॉर्म्सचे विश्लेषण केले. बांधकाम व्यावसायिकांसाठी निवासी सदनिका प्रकल्पांचे रेरा सर्टिफिकेट्स देताना फॉर्म ३ हा चार्टर्ड अकाउंटंट्सनी द्यायचा फॉर्म आहे. यात माहिती देताना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, या बाबतीत त्यांनी सखोल विवेचन केले.
दुपारनंतरच्या सत्रात सीए मंदार गाडगीळ यांनी आयकर कायद्यांतर्गत विवरणपत्र दाखल करताना वैयक्तिक नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी असणाऱ्या विविध विवरण पत