
कुंभवेतील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील कुंभवे येथील वृद्ध दुचाकी चालवत असताना तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल रामचंद्र पिंपळकर (६१, रा. कुंभवे) असे या वृद्धाचे नाव आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळकर हे वाकवली रोडने मोटारसायकलने जात असताना तोल जाऊन खाली पडले. यावेळी त्यांच्या हाता-पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथून अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण व नंतर मुंबई येथे हलवण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना पिंपळकर यांचा मृत्यू झाला. या बाबतची खबर डॉ. निशांत ठाकर यांनी पोलिसांना दिली. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.