
कुंभाड येथे प्रौढास मारहाण, एकावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील कुंभाड कुंभारवाडी येथे एका ६५ वर्षीय प्रौढास मारहाण केल्याप्रकरणी एकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन तुकाराम नरवणकर (वय -४७ वर्षे, रा. कुंभाड कुंभारवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर बजरंग विठ्ठल साळवी (वय ६५, व्यवसाय- शेती, रा. कुंभाड कुंभारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे.
यातील फिर्यादी हे त्यांचे राहते घरी कुंभाड कुंभारवाडी येथे हजर असताना फिर्यादी यांचे वाडीत राहणारे बबन तुकाराम नरवणकर (वय-४७,रा. कुंभारवाडी) यांनी दारु पिऊन येवून विनाकारण शिवीगाळी करुन कानाखाली मारली व पाठीत देखील हाताने ठोसा दिला तसेच त्याठिकाणी पडलेला दगड उचलला व फिर्यादी यांचे डोक्यात मारून दुखापत केली.