
चालकाचा ताबा सुटल्याने कारला अपघात
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे थोड्या वेळापूर्वी चारचाकीचा अपघात झाल्याची घटना थोड्या वेळापूर्वी घडली. तरूणाचा गाडीवर ताबा सुटल्याने चारचाकी काँक्रिटकरणावरून खाली घसरली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. चालकाच्या बाजूने कार खाली घसल्याने चालकाने उडी मारली. मात्र तोपर्यंत ट्रॅफिक जॅम चा सामान इतर वाहन धारकांना करावा लागला.
मारुती मंदिर येथील काँक्रिटकरणाचे काम चालू असल्याने एक लेन चालू करण्यात आली आहे. या लेन वरून दोन्ही बाजूकडील वाहने या लेन वरून जात आहेत. आज सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील अंगण प्लाझा बिल्डिंग समोर हा अपघात झाला. भाजी मार्केट कडून आलेल्या चारचाकी तरुणाला गाडी आवरता न आल्याने साईट पट्टीवरून घसरली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने मारुती मंदिर परिसरात घटना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र येथील काही नागरिकांनी ही गाडी उचलून रस्त्यावर आणल्याने थोड्या वेळातच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.