
देवरुखमध्ये एसटी बस पलटी होऊन वाहकासह ४ प्रवाशी जखमी
अपघातानंतर वाहन चालक फरार
संगमेश्वर :देवरूख- संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे एसटी बस पलटी होऊन चार प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरूनपळून गेला.
ही घटना आज गुरूवारी सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास घडली.
देवरूख आगारातून सुटलेली देवरूख- संगमेश्वर बस सुटली करंबेळे येथे आली असता चालकाचा उतारात गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या उजव्या बाजूला जावून बस पलटी झाली. सुदैवाने इतर प्रवाशी वाचले.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख आगाराचे आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे तातडीने घटनास्थळी धाव घेतली.