
भरणेत गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड
खेड : तालुक्यातील भरणे येथील एसटी थांब्याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून ३१२० रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी रवींद्र राजाराम पाष्टे (३८ रा. मोरवंडे-पंडमवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३१ लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल नवीन रामदास चव्हाण यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली.