
खेडमध्ये रस्त्यालगत उभी असलेली दुचाकी जळून खाक
खेड : शहरातील तीनबत्ती नाका येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून दुचाकीस्वाराचे नुकसान झाले.
येथील नगर परिषदेच्या अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांना आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. तीनबत्तीनाका येथील एका हॉटेलसमोर एम.एच. ०१ ए.एफ. १२८३ क्रमांकाची दुचाकी उभी होती. या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. या बाबत येथील नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ, जयेश पवार, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधन पवार, गजानन जाधव आदी तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र, आगीचा भडका उडाल्याने दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.