
मिऱ्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या समुद्रावर मासे गरवण्यासाठी गेलेले पाली चरवेली येथील दोघेजण बुडाले त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र एक बुडाला.
पाली चरवेली येथील तिघेजण दर सोमवारी मिऱ्या बंदर समुद्रावर मासे घरवण्यासाठी येत असत आज सायंकाळी ते तिघेजण मासे गरवत असताना यातील एकाच्या गरीला मासा लागला तो काढण्यासाठी वाकला असता मोठी लाट आली आणि त्या लाटेबरोबर तो पाण्यात खेचला गेला. बरोबरच्या सहकाऱ्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही गटांगळ्या खाऊ लागला यातील एकाला वाचवण्यात आले मात्र दुसरा पाण्यात बुडाला.
मयत झालेला तरूण हा पाली घवाळीवाडी असल्याचे कळते तर दोघे वाचलेले तरूण राहुल शिंदे व दिगंबर गराटे हे चरवेली येथील आहेत. त्यापैकी एकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत झालेल्या युवकाची बॉडी सापडली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे